Monday, 2 July 2012

स्वप्ने माझी तुझ्यापासून


स्वप्ने माझी तुझ्यापासून

आठवणी हि मिळाल्या तुझ्या पासून

तू तर दूर आहेस माझ्यापासून

पण नाही वेगळा हृदयापासून



रेशीम गाठी जन्मोजन्मीच्या

जुळल्या दोन मनांच्या

तोड नाही त्याला कशाची ...

भीती कशाला जगाची ...



असाच एकदा येउनी जा,

हाल मनीचे कळवूनी जा

स्वप्ने जी पाहतेय मी ,

सत्यात ती उतरवुनी जा....



हाल वेड्या मनाचे,

कळतील का रे तुला?

कधी हळुवार पणे अचानक ,

मिठीत घेशील का रे मला?



ध्यानी मनी तूच माझ्या ,

प्रत्येक श्वासातही तूच,

वेडी माझी प्रीत सख्या रे

येउनी कधी पाहशील का ?

हलकेच गालात ..


हलकेच गालात ...
हसून तुझे पाहणे,
डोळ्यातले तुझे
प्रेमळ ते पाहणे.
प्रेम का करावे
अन कुणावर करावे,
प्रश्नाला माझ्या या
तुझ्या अदाने उत्तर द्यावे...

तुझ्या आठवणी म्हणजे...

तुझ्या आठवणी म्हणजे...
मोरपिसाचा हळूवार स्पर्श
तुझ्या आठवणी म्हणजे...
नकळत निर्माण होणारा हर्ष

तुझ्या आठवणी म्हणजे...
स्वप्नांनी सजवलेलं एक गाव
तुझ्या आठवणी म्हणजे...
विरह सागरात हरवलेली नाव

तुझ्या आठवणी म्हणजे...
आयुष्य जगण्याची आशा आणि
तुझ्या आठवणी म्हणजे...
गमवलेल्या गोष्टींची निराशा

तुझ्या आठवणी म्हणजे...
पावसात चिंब भिजणं
तुझ्या आठवणी म्हणजे...
ओसाड वाळवंटात एकटच भटकणं

तुझ्या आठवणींशिवाय
आयुष्यच अर्थहीन आहे
तुझ्या आठवणींचा सहवास
हाच माझ्या आयुष्याच रंग आहे.....!!!

Sunday, 1 July 2012

आजही ती जेव्हा दिसते,


ती जेव्हा माझ्या आयुष्यात आली ...
वादळाप्रमाणे आली अन्
वादळाप्रमाणे गेली ...

आजही ती जेव्हा दिसते,
माझं चित्त विचलित होतं
तिच्या अपेक्षेने मन् रोमांचित होतं...
मन अपेक्षा करणं सोडून देतं,
जेव्हा ती अप्राप्य आहे हे कळतं...
कारण...कधीतरी माझं तिच्यावर प्रेम होतं ...

खरं तर प्रेम आजही आहे.
पण तिला हे समजणार कसं?
अन् मला हे तिला सांगणं जमणार कसं?

हे तर सहजच शक्य आहे,
समाजाच्या भिंती प्रेमात पार करणं
आणि एकमेकांत गुंतुन जाणं
पण हे तुला शक्य आहे का?
सामाजिक हितसंबंध जपणं
अन् माझ्यावर प्रेम करणं ...

तुझं प्रेम मिळवण्यासाठी तू म्हणशील ते करायला मी तयार आहे.
सध्या तरी तुझ्या प्रतिसादाची वाट बघणं एवढंच हातात आहे...
देशील का उत्तर........

तिच्या डोळ्यातला पाऊस होऊन


तिच्या डोळ्यातला पाऊस होऊन
बरसत राहावे,कधी हर्षाचा कधी खेदाचा..

कधी तिच्या ओठातले बोल होऊन
सांडत राहावे तिचे काव्य तर
कधी भावना बनून ...

कधी तिचा हळुवार स्पर्श
व्हावे, अलगद मोरपिसासारखे
फुलारून यावे,बहरून यावे...

तिच्या केसांची बट बनून
लहरावे,तिने सावरता
पटकन नाठाळ होऊन
अजून विस्कटून जावे....

कधी तिची वस्त्र बनून
तिलाच अलगद बिलगावे....
तिच्या नकळत तिच्या सौंदर्याचा
भाग बनून उरावे.....

तिच्या आरक्त पावलांची
कधी व्हावी रक्तिमा
तिच्या भाळीची चंद्रकोर
खुलताना कधी पाहावे ...

तिचा गजरा बनून कधी
राहावे तिच्या केसात
आभूषण बनून लखाखून
टाकावी तिची कांती...

मग तिच्या रागात, तिच्या
क्लेशात, उद्विग्नतेत उरावे
तिचा आत्मविश्वास बनावे कधी
पाहावे तिला परत सावरताना ...

अहं बाजूला ठेवून तिला
ओळखावे, कधी समजावे.
तिच्यासाठी तिच्या शब्दांसाठी
आनंदासाठी जगत राहावे.......


ती...मनाला स्पर्शुन जाते......

ती...मनाला स्पर्शुन जाते......
पण तरी ही मी कधी रडत नाही.,
एकट्यात बसुन खुडत नाही.,
पण एखादी अनामिक भीती वाटू लगते.,
माझ्या मनाला सतवु लगते.,
अंगावर चढून रडवायला लगते.,
तु नसतोस जवळ म्हणुन.,
तु समजुन उशी जवळ घेते.,
तुझ्या कुशीत सार विसरायला पाहते.,
अजुन ही भीती वाटली तर,
उशीला जोरात पकड़ते.,
अगदी जस तुला माझ्या हृदयातच घेते.,
मग कुठे मन शांत होत.,
तुझ्या स्वप्न मिठीत निजुन जात.,
तुझ्या प्रेमात चिंब भिजुन जात.,
तुझ्या आवाजाने जागीच थिजुन जात.,
मग हळूच ते तुझ्याकड़े धावायला लगत.,
तुझ्या स्पर्शासाठी खुप तडपत.,
दूरवर तुझी सावली दिसते.,
गालात हसून बोलते.,
अग मी येणारच आहे ना राणी.,
अग मी तुझाच आहे राणी.,
मी तुला कधीच नाही सोडणार ग.,
माझा जिव मी कसा सोडू ग.,
तुझ्यात माझा जीव आहे ग.,
तुझ्या मनाला जपत जा ग.,
तुला काही झाल की,
कालिज रडायला लगत.,
डोळ्यात मात्र चक्क वाळवंट जगत.,
पण कधी डोळ्यात थेंब आणत नाही.,
तुझ्या जिवाला नाजुकस दर्द देत नाही.,
मला तु खुप आवडतेस ग.,
माझ तुझ्यावर खुप प्रेम आहे ग.,
तु फ़क्त माझी.....
अन मी फ़क्त तुझाच आहे ग.......फ़क्त तुझाच........
तुझ्या प्रेमासाठी,
आणखी हजारो जन्म मागतो.,
श्वासा बरोबर दुआ मी मागतो.......

ती म्हणते त्याला.....

ती म्हणते त्याला.....
मी ही तुझ्यापेक्षा वेगळी नाही रे राजा.,
सारखी तुझी आठवण काढत असते.,
श्वास बरोबर तुझा आवाज ऐकत असते.,
कधी कधी तर खुप रडायला येत रे.,
पण तुला नाही आवडत म्हणुन,
पाणी डोळ्यातच थांबत रे.,
कधी कधी खुप भीती वाटते रे.,
तु माझ्यापासुन दुरावाला जातोयस.,
मला कधी सोडणार नाहीस ना रे.,
मला फ़क्त तुच पाहिजे रे.,

माझी ही अवस्था तुझ्यासारखीच आहे रे.,
किती ही त्रास झाला तरी,
तरी मी जीव सोडत नाही रे.,
क्षणभर रडते,
माझ्याच खांद्यावर डोक ठेउन.,
माझाच हात डोक्यावर घेउन.,
मलाच समजावत असते रे.,

कुठे ही गेले तरी तु सोबतच असतोस.,
न बोलता ही खुप समजावत असतोस.,
पण माझ्या बाजुला बसायला.,
माझ्या मांडीवर झोपायला.,
माझे गाल ओढायला.,
माझे ओठ तुझ्यात गुंतवायला.,
माझ्या हसण्यावर हसायला.,
माझा रुसवा पळवायला.,
मी लाजताना पहायला.,
तु जवळ नसतोस रे.,