Saturday, 7 July 2012

एकटा.....

गर्दीत मी एकटा चाललो ..
हो एकटा चाललो ..
मनातले वादळ शमवत चाललो ..
हो एकटा चाललो ...

कुणी न घेतले मज समजून
न उमजून...
माणुस धर्म निभवत चाललो..
हो एकटा चाललो...

एकटा जन्मलो या धरतीवर..
हो एकटाच मरणार...
मैत्रीच्या नात्यात स्वतःला गुंतवत चाललो ..
मनाचा गुंता सोडवत चाललो ..
हो एकटा चाललो....

घेतले न मज कुणी समजुन..
डोळ्यातले अश्रु मी लपवत चाललो ..
मनात मी रडत चाललो ...
हो एकटा चाललो ...

जन्म एकदाच मिळे..
त्याचे महत्व स्वतःस समजावत चाललो..
सर्वांचे मन मी जिंकत चाललो ..
हो एकटा चाललो ...

आलो एकटा जाणार ही एकटाच...
निसर्गाचा नियम मी पाळत चाललो ..
स्वार्थीपणा मी सोडत चाललो ..
हो एकटा चाललो ...मी एकटा चाललो ...!!!!

तुच म्‍हणायचीस ना....!


तुच म्‍हणायचीस ना
की,
मला तुझ्यावीना करमत नाही रे,
तुझ्यावीना एक क्षणही
सुखचा जात नाही रे.

माझ्या ओठांवर
तुच का असतोस,
आणि माझ्या स्‍वप्‍नातही
तुच का रे दीसतोस.

मी तुझ्या प्रश्‍नांनवर
मनातल्‍या मनात हसायचो,
उत्‍तरात तुला
'हेच ते "प्रेम"'
असे सांगायचो.

माझे उत्‍तर एकूण तु
मस्‍त लाजायचीस,
नंतर तो लाजलेला चेहरा
स्‍वताच्‍या हाताने झाकायचीस.

तुझी ती अदा
खुपच मनमोहक असायची,
त्‍यातल्‍या त्‍यात तु मला आनखी
वेडाही म्‍हणायचीस.

पण.....
पण तुला माझा असा
कुठला राग आला हे,
की
तुझ्यासाठी हा वेडा
एकदमच परका झाला हे.

तुझ्याचसाठी हसायचा,
तुझ्याचसाठी रडायचा,
हाच तो चेहरा ना ग
जो तुला स्‍वप्‍नात दीसायचा.

मग माझ्याशी आता तु
अशी का ग वागतेस,
मी दीसल्‍यावर अशी
नजर का फिरवतेस.
आता असे का ग......

माझ्यासाठी तुझ्या मनात
इतका राग का आहे,
का मी खरच
इतका वाईट आहे.

जाता जाता या वेड्यावर
एक उपकार करशिल का,
मला तुला काही सांगायच हे
एकदाच मला भेट‍शील का.

फक्‍त.....
फक्‍त एकदाच भेटून जा,
मला माझी चुक नको
शिंक्षा तर सांगुन जा.

नंतर मग....
तुझ्या ओठांवर काय, तर
तुझ्या स्‍वप्‍नातही येनार नाही,
आणि तु शोधशील तरी हा वेडा तुला
ह्या जगातही सापडणार नाही.
तु शोधशील तरी हा वेडा तुला
ह्या जगातही सापडणार नाही.

Monday, 2 July 2012

कोण आहेस तू माझा......!

"कोण आहेस तू माझा .......तुला कस रे सांगू....?
श्वास माझा तू...पण उत्तर शब्दात कस मांडू...? 

जग माझ आता तुझ्यापासून सुरू होत,
तुला आठवणच माझ्या हास्याला आता पुर होत.....

तुझ्याशिवाय जगण आता नाही रे जमत,
तुझ्याशिवाय मन आता कुठेच नाही रमत..... 


अंधारलेल्या वाटेवर हात नाही सोडणार न..?
विश्वास माझा तुझ्यावरचा कधी नाही मोडणार न...?

वचन नको मला...पण साथ दे तुझी...
तुझ्या सोबत जगण्याची स्वप्न आहेत माझी....

नको हा दुरावा......आता मला सहन नाही करायचं,
ठरवलय आता फक्त तुझ्या तुझ्यासोबत जगायचं.....

तुला विसरू नाही शकलो........

किती रडलो मी तुझ्यासाठी,
पण???
माझे आश्रू अडवू नाही शकलो.....
दू:ख  हे नाही की तू माझी झाली नाही,
दू:ख  हे आहे की तुला विसरू नाही शकलो........  

कधी तू ....!

कधी तू
झुकलेल्या पापण्यात
कधी तू 

ओझरत्या लाजण्यात
कधी तू
गाली ओघळत्या आसवात
कधी तू
माझ्या स्वच्छंदी हास्यात
कधी तू 
पैजणाच्या आवाजात
कधी तू
माझ्या असण्यात नसण्यात.....

कधी इतक प्रेम झालं...!

कधी इतकं प्रेम झालं,
काही कळलच नाही......

कधी इतक वेड लावलस,
काही कळलच नाही......

पहिल्यांदा कधी आवडलीस,
हे खरच आटवत नाही......

पण आठवण काढल्याशिवाय,
आता खरच राहवत नाही...............

आठवणी कधी मोजून ठेवता येत नाहीत.......

डोळ्यातले आश्रू मोजता येत नाहीत,
मनातील भावना मापता येत नाहीत,
हे खरे आहे की आठवण खूप येते,
पण आठवणी कधी मोजून ठेवता येत नाहीत.......