Sunday, 1 July 2012

जाता...जाता...!

जाता जाता मागे वळून गेली
सुगंध जाईचा दरवळून गेली
तिच्या बदामी डोळ्यांना नजर भिडली
अन..नजर माझी चुळबळून गेली
कोण होती कोणास ठाऊक..?
विचारात रात्र  सारी ढळून गेली
प्रेम नावाचे अंकुर फुटू लागले
प्रेमाच्या बीजाना पाणी घालून गेली
पुन्हा भेटू या कधी तरी......
एकटक नजर तिची बोलून गेली.............

No comments:

Post a Comment