एक आठवण..!!
एक आठवण..!!
एक हळवी आठवण मनामध्ये जपलेली
एक नाजूक वेदना हृदयात खोलवर रुतलेली
आसवांची एक माळ डोळ्यांमध्ये थांबलेली
आपुलकीची नाती आता दूरवर पांगलेली
स्वप्नांची एक पालखी अंधारात हरवलेली
गजबजलेली एक वस्ती आता एकांताला सारवलेली
पुन्हा तीच भावना नव्या शब्दांत मांडलेली
आसवांची थेंबभर शाई आज पुन्हा त्यावर सांडलेली...!!!
No comments:
Post a Comment