Saturday, 30 June 2012

मी तुझ्यावर प्रेम करतो......

मी तुझ्यावर प्रेम करतो.......
तुझ ते निरागस बोलण
मला खूप आवडत
चार चोघातही तुझ वेगळेपण  
अगदी आपसूकच जाणवत...

तुझ्या डोळ्यात दिसून येतो
माझ्यावरचा अतोनात विश्वास
खळखळून हसण तुझ
खरच वाटत झकास ......

माझा प्रत्येक शब्द
तू किती सहजपणे जपतेस
सांग बर ही कला
कोणत्या शाळेत शिकतेस....?

तुलाही फुलाप्रमाणे जपण्याचा

मी आटोकाट प्रयत्न करतोय
अभिमान वाटतो मला माझा
की मी तुझ्यावर प्रेम करतो .......
https://www.facebook.com/tufakt.mazichaahes

No comments:

Post a Comment